करमरकर फ़ाऊंडेशन, मुंबई
      माहितीकडे   कुलवृतांताकडे       वंशावळी व्यक्ती   व्यक्तीच्या सूची   नावे व गोत्रे  
     
 
             मुख्य पान
 
             आमच्याबद्दल
 
             आमचा इतिहास
 
             चित्तपावनाविषयी
 
             कुळदैवते
 
             विविध सण
 
             कुळाचार
 
             बोडणाचे गीत
 
            संप्रणाली
 
            माहितीचे मुद्दे
 
            संर्पकासाठी
 
आभार प्रकाशित कुलवृत्तांत संपादकीय निवेदन  
कुलवृत्ताचे प्रयोजन- 1  2  3  4           
 

३) कुलवृत्तांची सामाजिक पुर्वपीठिका -
देवधर कुलवृत्तांतात श्री लक्ष्मण विश्वनाथ दीक्षीत म्हणतात की मानवशास्त्र( Anthropology), मानववंशशास्त्र (Ethnology) समाजशास्त्र (Sociology,Scince Of The Nature and Growth of Socitey )नागरिकशास्त्र (Cives)व राज्यशास्त्र (Politics) ह्या सर्व शाखांचा उपयोग अन्योय संबंध आहे मानवाची प्रगती कशी होत गेली व कशी होणे जरुर आहे ह्यासंबधीचे निष्कर्ष करण्यास वरील शास्त्रांचा अभ्यास उपयोगी पडतो.समाज शास्त्राप्रमाणे सामाजि क प्रगतीची स्थुल मानाने चार स्थित्यंतरे मानण्यात आली आहे पाहिला ट्प्पा म्हणजे मृगयावती (The Hunting Stage )दुसरा ट्प्पा म्हणजे गोपाळवृत्ती(The Nomadic stage)तिसरा ट्प्पा म्हणजे कृषिवृत्ती (Agriculture Stage) व चौथा ट्प्पा म्हणजे उद्योगवृत्ती (The Industrial Stage).मानवशास्त्र व समाजशास्त्राचा अभ्यास करताना प्रत्येक वंशाची हकीकत व त्याची कुलकथा त्याची पारिस्थिती व प्रगती या संबंधी अभ्यासु वाचकाला संकलित माहिती मिळाली तर ती त्याला उपयोगी पडेल व त्या माहितीवरुन त्याला अनुमानाने काढता येईल व ती व्यवहारात सत्य सृष्टीत कितपत अनूभवाला येतात ते पहाता येईल
४) समारोप
आपला हा कुलवृत्तांत म्हणजे एक अमोलिक धन आहे ह्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडतच राहणार आहे सर्व कुलबांधवांनी ह्याची जाणीव ठेवुन प्रत्येकाच्या घरातील अपत्य जन्म लग्न मृत्यु लौकिक व अलौकिक सत्कार ह्याची माहीती वेळोवेळी करमरकर फ़ाऊडेशन देत राहावी आणि असे केले तरच हा कुलवृत्तांत सदैव ताजा राहिल आपणा सर्वांना कुलदैवत हरीहरेश्ववर कुलदैवता श्री केळाईदैवी अशी सद्दबुध्दी देवो अशी प्रार्थना करुन हा लेख येथेच पुर्णवितो.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
कुलवृत्तांत संकलनासाठी (दाही) दिशा’
जगातील प्रत्येक संस्था काही विशिष्ट उद्देशासाठी जन्माला येते व त्या संस्थेची संकल्पना ज्यांच्या मनी असते त्या व्यक्त्ती उद्दीष्ट पूर्तीसाठी सतत झटत असतात त्याला आपली करमरकर फ़ाऊडेंशन ही संस्था अपवाद नाही.आपल्या संस्थेपूढे कुलवृत्तांत हा उद्देश होता व त्याला यश मिळत नव्हते व त्यामूळे एक काळ असा आला की संस्था कुलवृत्ताताच्या संकल्पनेपासुन फ़ार दुर जात किंवा काय असा संभ्रम निर्माण झाला आज आपणांसमोर कुलवृत्तांची प्रथम आवृत्ती आहे याचे खरे शिल्पकार श्री.श्याम रघूनाथ करमरकर हे आहेत गेल्या स्नेहसंमेलनाच्या वेळी जाहिरपणे आश्वासन दिले होते की पुढील संमेलनापुर्वी कोणत्याही पारिस्थितीत कुलवृत्तांताची प्रथम आवृत्ती प्रासिध्द केली जाईलच अर्धवट काम अर्धवट टाकणे हा अर्धवटपणा आहे त्यामूळे श्रम पैसा व वेळ याचा अपव्यय होतो व उद्दिष्टपुर्तता न झाल्यामुळे निराशा पदरी पडते पर्त काही काळा नंतर पुनरबांधणी करणे कठीण जाते उद्दिष्टपुर्ततेसाठी प्रथम संकलन हे फ़ार महत्त्वाचे आहे कुलवृत्तांत म्हणजे कुटूंबाची केवळ माहीती छापणे नाही तर संकलानंतर ती माहिती विशिष्ट प्रकारे जुळवाजुळव करणे त्यासाठी अपारकष्ट् एकाग्रता यांची नितांत जरुर असते.आपल्या कुलवृत्तांतासाठी प्रथम नव्याने माहीती एकत्र मिळविणे क्रमप्राप्त होते त्या साठी नवीन फ़ॉर्म तयार करणे ही पहिली पायरी होती त्या फ़ॉर्ममध्ये शक्यतो सर्व माहिती मिळु शकेल अशा त-हेने फ़ॉर्म तयार करणे क्रमप्राप्त होते फ़ॉर्म परत व्यवास्थित भरुन परत मिळवयाचा असेल तर नमुना फ़ॉर्म पाठविणे ओघानेच येते म्हणुन प्रत्येक को-या फ़ॉर्म बरोबर एक नमुना फ़ॉर्म पाठवणे भाग पडेल.

मागे पुढे          
 
  Site Designed and developed by Hans technologies              Best viewed at 1024 by 768 resolution. IE. 5.0+